मंडणगड | प्रतिनिधी: मंडणगड येथील मंडणगड तालुका विकास मंडळ F 1428 मुंबई संचलित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मध्ये पालक शिक्षक संघ सर्वसाधारण सभा शैक्षणिक वर्ष 2023/ 24 आज शनिवार दिनांक ०८ जुलै 2023 रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत पार पडली. या सभेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषता महिला पालकांची उपस्थिती सर्वाधिक होती. सर्वप्रथम विद्यालयातील पालक शिक्षक संघ विभाग प्रमुख श्री. दहिभाते सर यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांना विचार मंचावर बसण्याची विनंती केली. तदनंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुंदर असे ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा .सौ. प्रतिभा पाटील मॅडम यांनी पालक शिक्षक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. दुर्गवले मॅडम व माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. शितल जाधव मॅडम यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर मा. उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी सर यांनी ऍड. श्री. दयानंद कांबळे, पत्रकार श्री. भरत सरफरे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर सर यांनी रमेश बनसोडे, नाकती गुरुजी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर संस्थेतील सदस्य, कर्मचारी व दिवंगत व्यक्ती, तसेच कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील कालकथित व्यक्ती ,शहीद जवान यांना मुख श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
त्यानंतर श्री. दहिभाते सर यांनी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार पालक शिक्षक संघाची आवश्यकता व त्याची कामे व जबाबदारी याबाबत प्रास्ताविक केले व मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यास सर्वांनुमते मंजुरी घेण्यात आली.
विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संजय अहिरे यांनी शालेय शिस्त व विद्यार्थी आरोग्य याबाबत मार्गदर्शन करताना, पौष्टिक आहार, पुरेशी झोप हे आरोग्याचे मूलभूत घटक असल्याचे सांगितलं. विद्यार्थ्यांकडे पालकांनीही लक्ष देऊन त्यांना फास्ट फूड खाण्यास मनाई करावी. गणवेश, वैयक्तिक स्वच्छता आणि मोबाईल टाळण्याबाबत सुचित केले.
विद्यालयातील शिक्षिका सौ. राणे मॅडम यांनी पाल्याच्या गुणवत्तेत पालक, शिक्षक हे महत्वाचे घटक आहेत. सुजाण पालकांनी आमच्याबरोबर आपली ही महत्त्वाची भूमिका पार पाडणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा इत्यादी परीक्षांच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. श्री. पिंगळा सर यांनी मार्गदर्शन करताना परीक्षा पद्धती बदलते आहे. मूल्यमापन बदलते आहे. याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर वर्षभरामध्ये होणाऱ्या दोन चाचण्या व दोन सत्र परीक्षा, सेतू परीक्षा यांच्या खर्चाबाबत माहिती दिली. श्री. नाकती गुरुजी यांनी, आपण आपलं पाल्य शाळेत पाठवल्यानंतर शिक्षक हेच त्यांचे पालक आहेत. त्यांना घडवणारे आहेत, आणि म्हणून शिक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे. असे सांगितले. श्री. खळे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च आपण सर्व पालकांनी उचलावा असे आव्हान सर्व पालकांना केले. त्यानंतर दयानंद कांबळे यांनी पालकांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या याबाबत मार्गदर्शन केले. आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षक गुणवत्ता वाढवत आहे, टिकवत आहेत ,त्याबद्दल आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत असे सांगितले. श्री. हुंबरे सर व सौ. शारदा शिरसाठ यांनीही पाल्यांच्या अडचणी दूर करण्याबाबत सांगितले.
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक हुल्लोळी सर यांनीही आपण पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. पाल्यांच्या प्रगतीसाठी आपण झटले पाहिजे. विद्यार्थ्यांचा मोबाईल बंद केला पाहिजे. मोबाईलचे दुष्परिणाम व चांगला उपयोग अशा प्रकारे मूलभूत मुद्द्यांना हात घालत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सभेच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा पाटील मॅडम यांनी पालकांना संबोधित केले. त्या म्हणाल्या तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील त्या आमच्या पुढे मांडा मी व माझे सर्व कर्मचारी आम्ही त्या दूर करण्याचा प्रयत्न करू आणि आपण सर्वजण मिळून आपल्या विद्यालयाची पर्यायाने आपल्या पाल्यांची गुणवत्ता कशी वाढेल ? यासाठी कसोशीने प्रयत्न करू असे सांगितले. त्यानंतर पाचवी ते दहावी इयत्ता नुसार पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. शेवटी विद्यालयातील शिक्षक किशोर कासारे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार व्यक्त केले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.