सावंतवाडी सालईवाडा परिसरात बंद घर फोडले चोरट्यांचा चांदीच्या भांड्यांवर डल्ला : तक्रार दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहर व परिसरात चोरी व घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे.
सावंतवाडी सालईवाडा भागात राहणार्या निवृत्त एसटी कर्मचारी सुधीर भोगटे यांच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. यात घरात असलेली चांदीची भांडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. शुक्रवारी हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, मुंबईत राहत असलेले भोगटे आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी, उपनिरिक्षक सुरज पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह जावून त्या ठिकाणी पंचमाना केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, या ठिकाणी फ्लॅट असलेले सुधीर भोगटे हे मुंबईत राहतात. तर या ठिकाणी येवून-जावून असतात. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी उघड झाला. मात्र, ते बाहेर असल्यामुळे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी त्यांना दुरध्वनीवरुन कल्पना दिली.
शनिवारी ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठीकाणी धाव घेत पंचनामा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील कपाटात ठेवण्यात आलेली चांदीची भांडी चोरट्याने नेली. मात्र, बाजूला असलेली पितळेची भांडी त्याच ठिकाणी ठेवून चोरटा निघून गेला आहे. घरात काही मौल्यवान वस्तू किंवा रोकड नसल्यामुळे अन्य काही चोरीला गेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
Home ताज्या घडामोडी सावंतवाडी सालईवाडा परिसरात बंद घर फोडले चोरट्यांचा चांदीच्या भांड्यांवर डल्ला : तक्रार...