उभादांडा येथील चोरी प्रकरणी दोन्ही संशयितांना जामीन मंजूर..

उभादांडा येथील चोरी प्रकरणी दोन्ही संशयितांना जामीन मंजूर..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
उभादांडा येथील श्री देव सागरेश्वर मंदिरालगत असलेल्या धर्मशाळेच्या खोलीच्या कपाटातील रोख रक्कम चोरी प्रकरणातील आरोपी गौरव सुदेश मराठे व दिनेश राजन मिसाळ यांना वेंगुर्ले पोलिसांनी वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १० हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर न्यायालयाने त्यांची मुक्तता कली. संशयितांतर्फे ॲड. तेजश्री कांबळी यांनी काम पाहिले:
उभादांडा-सागरेश्वर येथील सागरेश्वर मंदिरालगत असलेल्या धर्मशाळेच्या कपाटात ‘ठेवलेल्या १७२२ रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार सागरेश्वर देवस्थानचे पुजारी विनायक सांडये यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली होती. त्यानुसार गौरव सुदेश मराठे (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) व दिनेश राजन मिसाळ (रा. वेंगुर्ले कॅम्प गवळीवाडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दोघेही चोरीनंतर फरार झाले होते. पोलिसांनी तपासांती त्या दोघांना सातारा येथून ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणीअधिक तपास पो. हे.कॉ. योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.