कणकवली रोटरी क्लब चे रवींद्रनाथ मुसळे यांचे निधन.!

कणकवली : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ नागारिक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ वसंत मुसळे (69) यांचे निधन झाले. रविवारी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्याने रवींद्रनाथ मुसळे हे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुणालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 8 वा. सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Death of Rabindranath Musale of Kankavali Rotary Club.

रवींद्रनाथ मुसळे हे कणकवली रोटरी क्लब पदाधिकारी, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक, गोपुरी आश्रमचे पदाधिकारी होते. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असाचाय. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंस म्हणून पुढील वर्षाकारिता त्यांची नुकतीच नियुक्त करण्यात आली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे शोककळा पसरली आहे.