देशातील सर्वसामान्य नागरीकाला आत्मनिर्भर करण्याचे काम बॅकेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले – डाॅ. भागवत कराड

मंडणगड | प्रतिनिधी – देशातील सर्वसामान्य गोरगरीब नागरीकाला आत्मनिर्भर करण्याचे काम बॅकेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तालुक्यातील भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृह येथे आयोतिज लोन मेळाव्यातकेले. यावेळी खेड,दापोली, मंडणगड या तीन तालुक्यातील सुमारे 2000 गरजुंना 70 करोड रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी बोलतान श्री. कराड म्हणाले की.2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रधान सेवक म्हणून काम सुरू केले आणि त्यांनी काम करत असताना सर्व प्रथम बँकेमध्ये अमुलाग्र बदल करून आणले मोदी यांनी त्यांच्या माध्यमातून बँकांमध्ये वेगवेगळ्या योजना सुरू केल्या प्रधानमंत्री जनधन योजना सारखे योजना राबवल्या आणि जनतेला बँकेत न बोलता बँकेला जनतेपर्यंत जाण्यास सांगितले यामुळे अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागात खेडोपाडी जाऊन झिरो बॅलन्स मध्ये लोकांचे खाते उघडले त्यामुळे देशात साडे 49 कोटी लोकांनी खाते उघडले तोपर्यंत एवढ्याा जनतेचे बँकेत खाते उघडले गेले नव्हते. आज ही खाती आधार कार्ड, मोबाईल यांच्याशी लिंक केले गेले आहेत.यामुळे डायरेक्ट मनी ट्रान्सफर यासारखी उपक्रम राबवले आहेत त्यामुळे कोणीही नागरिक कुठेही पैसे पाठवू शकतो त्याला बँकेत जावयाची गरज लागत नाही एवढी बँक व्यवहारात विकासत्मकता आणली आहे .याआधीचे आपले प्रधानमंत्री असे म्हटले होते की आम्ही जनतेच्या खात्यात शंभर रुपये टाकले तर ते त्यांच्या खात्यात पोचेपर्यंत पंधरा रुपये होतात 85 रुपये मध्येच गायब होतात, मात्र आता शंभरच्या शंभर रुपये लाभाथ्र्यांना मिळत आहेत. बॅंकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, काबाडकश्ट, मोल मजुरी करणाÚया सर्वसामांन्याचे बॅंकेषी नाते जुळले व जनता व्यवहार करायला लागली आहे. मोदी सरकार छोटे-मोठे उद्योग करणारे व्यावसायिक असतील गोरगरीब जनतेसाठी, महिला सक्षमीकरण यासारख्या विविध प्रकारच्या योजना बँकांमार्फत मोदीजींनी अमलात आणल्या, आणि त्याचा फायदा प्रत्यक्षदर्शी जनतेला होत आहे. यावेळी खेड, दापोली मंडणगड या तीन तालुक्यातील सुमारे 2000 गरजू लाभाथ्र्यांना 70 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे या देशातल्या गरिबातल्या गरीब जनतेला दोन पैसे मिळवून छोटा मोठा व्यवहार सुरू झाला पाहिजे आणि तो स्वावलंबी झाला पाहिजे त्याचे उत्पन्न वाढले पाहिजे त्याकरीता बॅंक जनतेच्या दारापर्यंत गेली पाहीजे आणी आज खरोखरज त्याचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेला होत आहे. महिला व्यवसाय उत्तमरीत्या करत आहेत महिलांचे कर्ज परत फेडण्याचे प्रमाण देखील अधिक आहे त्या प्रामणीकपणे व्यवसाय करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी एस.बी.आय, बॅंक आॅफ इंडीया, बॅंक आॅफ बडोदा, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, युको बॅंक, कॅनरा बॅंक, पंजाब नॅषनल बॅंक, आय.डी.बी.आय. बॅंक,एक्सी.स.बॅंक, बॅक आॅफ महाराश्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बॅक या बॅंकांचे अधिकारी व कर्मचारी व लाभार्थी मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन बॅंकआॅफ इंडीया अंाचलीक कार्यालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने मंडणगड षाखेने केले.