मंडणगड | प्रतिनिधी : वंचीत शोषीत पिडीत समाज घटकाची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने ग्रामिण भागात सुरु केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पद्मश्री दादासाहेब इदाते यांच्या नावाशी जोडले गेल्याने महाविद्यालयाशी संबंधीत सर्व घटकांवर या नावास साजेशी कामगीरी करण्याची जबाबदारी वाढलेली असल्याने आगामी काळात उत्तम शैक्षणिक प्रगती करत महाविद्यालयाचे प्रगतीचा आलेख चढता ठेवावा असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री श्री. भागवत कराड यांनी मंडणगड येथे केले. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ जालगाव या संस्थेच्या तालुक्यातील मंडणगड व कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयांचे श्री. कराड यांच्या हस्ते 8 जुलै 2023 रोजी पद्मश्री कर्मवीर भि.रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड व कुंबळे असे नामकरण करण्यात आले. या निमीत्ताने मंडणगड येथे आयोजीत स्वागत सत्कार समारंभात ते बोलत होते, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री दादा इदाते, संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर, उद्योजक ऋषी भटनागर, प्राचार्य राहूल जाधव उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले श्री. दादा इदाते यांनी संघाच्या समरसता मंचाचे माध्यमातून सामाज विकासाकरिता खोप मोठे काम केले आहे मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नाविषयी त्यांचा अभ्यास लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगावर सलग पाच वर्षे काम करण्याची संधी दिली व दादांनी या संधीचे सोनो करत देशातील छत्तीस राज्यांत प्रवास करुन भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांचा अभ्यास केला. त्या सोडवण्यासाठी देशव्यापी संघटन उभे केले व अभ्यासानंतर या समाजाच्या विकासाकरिता शासानाने कोणत्या उपाय योजना कराव्यात यांचे मार्गदर्शनही केले आहे. समाजाच्या विकासाकरिता ते सतत कार्यमग्न असतात. त्यांनी सुरु केलेली शिक्षण संस्था ही केवळ आणि केवळ दुर्लक्षीत समाज घटकाचे सेवेकरिता आहे त्यांमुळे संस्थाचालक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महविद्यालयाचे प्रगतीसाठी पुढे येऊन अधिक जबाबदारी काम करावे असे यावेळी सांगीतले. यावेळी पद्मश्री दादा इदाते यांनी मनोगत व्यक्त केले तर संपदा पारकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊ इदाते, कार्यवाह सतिष शेठ, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, महेश गणवे, मुख्याध्यापक सुनील घाणेकर, भास्कर जायभाये, अनिल लोखंडे, श्रीरंग राणे, संदेश लोखंडे, नूर हसन कडवेकर सर्व संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कुंबळे पंचक्रोशी व मंडणगड शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक प्राचार्य राहूल जाधव, तर सुत्रसंचालन प्रा. संगीता घाडगे यांनी केले. उपप्राचार्य वाल्मिक परहर यांनी आभार मानले.
Home ताज्या घडामोडी मंडणगड व कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कारड...