खेड | प्रतिनिधी :
खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक येथील एका घरातून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस चोरून नेल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुशरा अहमद हजवानी ,इम्रान अब्दुल हजवानी असे त्या चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत ही घटना ३० जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघड झाली या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोघां विरोधात भा द वि क ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे