सावंतवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुहास सातोस्कर

 

सचिवपदी प्रवीण परब तर खजिनदारपदी भालचंद्र कशाळीकर यांची निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक सुहास सातोस्कर तर सचिवपदी कुंब्रल गावचे माजी सरपंच प्रवीण परब व खजिनदार भालचंद्र आबा कशाळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०२३-२४ या वर्षभरासाठी आहे.
रोटरी क्लबला सावंतवाडीला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी रोटरी क्लबच्या अध्यक्ष व सचिव व पदाधिकारी बदलतात. यंदाही कार्यकारणी बदलण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी वेळी अनंत उचगावकर, सोमनाथ जिगजींनी, राजेश पनवेलकर, सत्यजित धारणकर, प्रमोद भागवत, बाबल्या दुभाषी, राजन हावळ, सुबोध शेलटकर, राजेश रेडीज, आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबच्या माध्यमातून नेत्र रुग्णवाहिका लवकरच आणण्यात येणार आहे, असे अनंत उचगावकर यांनी स्पष्ट केले.