संजू परब देखील मैदानात : प्रचारात सहभाग
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील अतिशय लक्षवेधी ठरत असलेल्या माजगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचारात भाजपा बाळा साहेबांची शिवसेना
युतीच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना रामचंद्र सावंत यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला असून त्यांना मतदारांची चांगली साथ मिळत आहे. विकास व परिवर्तन या मुद्द्यावर भाजपा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जात प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत.
दरम्यान, भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब प्रचारात सहभागी झाल्याने युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला आहे. संजू परब यांच्यासह भाजपचे पक्ष निरीक्षक मनोज नाईक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, माजी पं.स. सदस्य बाबू सावंत, शाम कासार, अजय सावंत यांनी अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ‘डोअर ट्र डोअर ‘ प्रचारावर भर दिला आहे.
संजू परब यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह प्रचारात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी
माजगांवच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी भाजपा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चना सावंत यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन प्रचारावेळी संजू परब यांनी मतदारांना केले. माजगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतीत युतीच्या सरपंचांसह युतीच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर संपूर्ण माजगांव गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. यासाठी गावाच्या विकासाची धुरा सुशिक्षित आणि विचारी माणसांकडे देण्याची गरज आहे. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी गावासाठी झोकून देणारे आणि गावाच्या विकासाची जाण असणारे तरुण तडफदार कार्यक्षम उमेदवार युतीने दिले आहे. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना गावाची सेवा करायची संधी द्यावी, सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असलेल्या या सर्व उमेदवारांना तुमचा पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता येत्या १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याव असं आवाहन संजू परब यांनी केले.
तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने व सामाजकार्याची आवड आहे. माझा शिक्षण व अनुभवाचा फायदा गावच्या विकासासाठी होण्यास मी कटिबद्ध आहे. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना नेत्यांची साथ आम्हाला आहे. त्यामुळे नारळ चिन्हा समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करावे, तसेच भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत गाव विकास पॅंनलच्या १३ ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत यांनी केले.
दरम्यान, पत्नी डॉ. अर्चना सावंत यांच्यासह युतीच्या पॅनलच्या विजयासाठी प्रचारात सहभागी झालेले भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस रामचंद्र ऊर्फ अजय सावंत म्हणाले, कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी कोकणच्या विकासाचा घेतलेला ध्यास व आमच्या गावातील माजी जि. प. अध्यक्ष रेश्मा रविकांत सावंत व पं. स. सदस्य श्रीकृष्ण सावंत, माजी सभापती अशोक दळवी यांनी माजगांव गावामध्ये राबविलेली अनेक विकास कामे या सर्वांच्या विकासाचे स्वप्न एकच असून त्याचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले भाजप युतीचे माजगांव गाव विकास पॅनल निवडून देणे ही काळाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद हे तीन भाग असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपकडेच येणार आहे. केंद्रात सत्ता भाजपची आहे. पालकमंत्री सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे विकासाची कामे करण्यासाठी ग्रामपंचायत देखील भाजप युतीकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. अर्चना सावंत यांच्यासह युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अजय सावंत यांनी केले.
या प्रचारात बाळा वेजरे, रिचर्ड डिमेलो, सचिन बिर्जे, विजय सावंत, श्वेता माजगांवकर,रिया राकेश सावंत,सुरेंद्र निब्रे, शितल बापूजी भोगणे, उमीला उदय मोर्ये, किरण माडखोलकर, माधवी दत्तगुरु भोगण,विशाखा विनोद जाधव, प्रज्ञा बाबल भोगण, संतोष विष्णू वेजरे, गिता शाम कासार, मधू भिवा कुंभार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Sindhudurg