चिपळूण :
चिपळूण मधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाले.
सुट्टीच्या दिवशी नदीच्या डोहात आंघोळ करणे आले अंगलट.
बुडालेले दोघेही दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती…..इतर सहा जण सुखरुप.
अतिक आणि अब्दुल अशी बेपत्ता दोन मुलांची नावे.
दोघेही चिपळूण मधील स्थानिक असल्याची माहिती.
शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल.
दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरवात.
गोवळकोट रोड ता -चिपळूण येथील आठ मुले तीन बाईक वरून फिरण्यासाठी कुंभार्ली गावातील आशरकोंडा या नदीच्या ठिकाणी आले होते. पैकी दोन मुले पाण्यात उतरली होती. वरच्या बाजूला पाऊस आल्यामुळे झोपडी मध्ये उभी होती उतरलेल्या मुलांचा बचाव बचाव असा आवाज आल्याने ते खाली आले. त्यावेळी दोन्ही मुलं जी पाण्यात होती ती बुडाल्याची त्यांच्या लक्षात आले.
पाण्यात बुडालेली मुलांची नावे
1) आतिक इरफान बेबल वय 16 ते 17 च्या दरम्यान
2) अब्दुल कादिर नौशाद लसाने वय 17 ते 18
दोघे राहणार चिपळूण शहर
स्थानिक पोहणाऱ्या मुलांची टीम आहे. फ्लड लाईट व रशीची व्यवस्था केली आहे.कुंभारली डोहात मुलांचे शोधकार्य चालू आहे.
त्याठिकाणी national highway कडून light van पाठविली आहे. नगरपालिकेकडून टॅार्च, बोट पाठविली आहे. प्रवाह जास्त असल्याने पाण्यात उतरणे शक्य नाही.