उद्धव ठाकरे यांच्या खोट बोलण्याची ग्रीनिज बुक मध्ये नोंद होईल. ; आमदार नितेश राणे

उद्धव ठाकरे यांच्या खोट बोलण्याची ग्रीनिज बुक मध्ये नोंद होईल. ; आमदार नितेश राणे
*पत्राचाळ मधील चोरट्यांनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देऊ नये
* जो धर्माचा आणि बापाचा झाला नाही. तो राज्याचा आणि देशाचा होऊ शकत नाही
*आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घणाघात
फोटो;;
संतोष राऊळ ( कणकवली )
उद्धव ठाकरे यांचे याची खोटे बोलण्यात पीएचडी झालेली आहे. त्यांच्या खोटे बोलण्याची अनेक उदाहरणे देता येतील. मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ९९ सालापासून खोटे बोलत आहेत.२००४,२००९,२०१४,आणि २०१९ पर्यंत कशा पद्धतीने कुठे कुठे कसे खोटे बोलले याची क्रमवारी काढल्यास ग्रीनिज बुक मध्ये नोंद होईल. उद्धव ठाकरे यांचे रेकॉर्ड पाहता कॅरेक्टर ढिले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे पत्राचाळ मधील चोरट्यांनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देऊ नये अशी खरमरीत टीका भाजप नेते आमदार नितेश राणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उभाठा सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राजाराम राऊत हे कुठचा नशा करून बोलत होते. कदाचित कालच्या रविवारचा नशा त्यांचा उतरला नसलावा. ठाकरे खोटे बोलत नाहीत असे ठणकावून सांगतता. आम्हाला उद्धव ठाकरे चांगलेच माहित आहेत आम्ही त्यांचा ३९ वर्ष प्रवास जवळून पाहिलेला आहे.तेव्हा हेच संजय राऊत ठाकरेंच्या विरोधात गरळ ओकत होते. उद्धव ठाकरे नुसते खोटे बोलत नाही तर खोटे बोलण्याचा कळस घेतलेला आहे. आज पर्यंत प्रत्येक पावलावर खोट बोलून विष पेरले आणि निष्ठावंतांना बाजूला केले. असा कपटी माणूस म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.
पोहरा देवीची शपथ घेऊन सत्य वचन बोलतो असे सांगण्याची ठाकरे हे दुर्दैव आहे.प्रामाणिक माणसाला शपथ घ्यावी लागत नाही. जे आपल्या धर्माचा, बापाचा झाला नाही. तो राज्याचा आणि देशाचा होऊ शकत नाही.
अशा प्रकारचा संजय राऊत यांचा पावला पावलावर खोट बोलणार मालक आहे.
स्वतः मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत बसून खोटं बोलला.पुराव्यासाठी पत्नीला पुढे केले.जो वयेक्ती बाळासाहेबांचा खोलीत बसून खोट बोलू शकत तो कोणाचाच होवू शकत नाही. उद्धव ठाकरे ठाकरे याचे चारित्र्य उभा महाराष्ट्र ओळखतो. त्याला पत्राचाळ्यातील चोरीच्या आरोप असलेल्या, महिला डॉक्टरची मानसिक छळ करणाऱ्या व्यक्तीने सर्टिफिकेट देऊ नये.
येणाऱ्या दिवतात संजय राऊत यांच्या मालकाचा मुलगा आणि मेहूना यांना कोणी वाचवू शकत नाही. तो आर्थर रोड जेल मध्ये अंधारा कोठडीत त्यांनी किती भ्रष्टाचार केला याचे पुरावे आमच्यातील लागलेला आहेतच. असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राम मंदिर ची मागणी पूर्ण केली.३७० कलम हटविले. भ्रष्टाचार मुक्त भारत महत्त्वाचे पाऊल उचलले. दहशतवाद आतंकवाद पाकिस्तान किंवा इतर देशांपासून भारत देश सुरक्षित केला त्यांच्याबद्दल खोटे आरोप उद्धव ठाकरे करत आहेत यातून त्यांची नैतिकता दिसून येते. उद्धव ठाकरे यांचा शब्द कोणीही खरेदी करू शकतो. शब्दाचे रेट कार्ड काय आहे हे जनतेला माहित आहे. असे शब्द टीका केली.
जो नियम संजय राठोड ना लावला तो नियम आदित्य ठाकरे का लावला नाही.राठोड यांचेवर किती अन्याय केला.तुझ्या मातोश्री २ मध्ये ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत दुसऱ्या कोणाला भ्रष्टाचार करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे दुसऱ्यांना चोरांचा मॉल बोलण्यापेक्षा तुमचा चोरांचा बाजार उठण्याची वेळ झाली आहे.
* रोहित पवार सुळे गटाचा पप्पू
रोहित पवार हा त्यांचा राहुल गांधी आहे. सुळे गटाचा पप्पू म्हणजे रोहित पवार त्याने पहिलं आपलं घर सांभाळावे.असा सल्ला दिला.तर पक्ष चोरला म्हणता तेव्हा तुम्ही झोपा काढत असता का ? की भ्रष्टाचार करत असता ? शिंदे व पवार यांनी स्वाभिमानासाठी निर्णय घेतला आहे. पोहोरादेवी महंत यांना आमचा ३९ वर्षाचा हिंदुत्ववादी इतिहास माहीत नसेल. उद्धव ठाकरेंच्या सहवासात राहून ते तसे झाले आहेत. माझं हिंदुत्व युवकांना विचारा.जनता सांगेल.मुंबई करांच्या लुटीतून मातोश्री 2 उभं झालं आहे.जस संजय राऊत उबाटा ला संपवणार तस रोहित पवार सुळे गटाला संपवणार असे ही आमदार नितेश राणे यांनी टीका केली.