प्रतिक बांदेकर यांची दुरुस्तीची मागणी : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरातील विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या गटाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते प्रतीक बांदेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.