अध्यक्ष पदी राजू वजराटकर तर सेक्रेटरी पदी योगेश नाईक
वेंगुर्ले : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन ची सन 2023-24 साठी नूतन कार्यकारी जाहीर झालज असून अध्यक्ष पदी श्री शंकर उर्फ राजू वजराटकर यांची निवड करण्यात आली आहे.तसेच सेक्रेटरी पदी श्री योगेश नाईक,उपाध्यक्ष पदी अँड प्रथमेश नाईक,खजिनदार पंकज नाईक यांनी एकमताने निवड करण्यात आली.
रोटरी क्लब वर वेंगुर्ला मिडटाऊन ची बोर्ड ऑफ डिरेक्टर ची सभा दिनांक १ जुलै रोजी स्वामिनी मंगल कार्यालय मध्ये पार पडली.यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी,खजिनदार तसेच संपूर्ण तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.यामध्ये वारी चार पदांसोबत सार्जंट ऐट आर्म्स आनंद बोवलेकर,क्लब सर्व्हिस राजेश घाटवळ, व्होकेशनल सर्व्हिस गणेश अंधारी,कम्युनिटी सर्व्हिस संजय पुनाळेकर,युथ सर्व्हिस मृणाल परब,इंटरनॅशनल सर्व्हिस दीपक ठाकूर,स्पोर्ट्स डिरेक्टर मुकुल सातार्डेकर,टी आर एफ चेअरमन दिलीप गिरप,पोलिओ प्लस चेअरमन सदाशिव भेंडवडे,लिटरसी चेअरमन नितीन कुलकर्णी,पब्लिक इमेज चेअरमन सचिन वालावलकर,सर्व्हिस प्रोजेस्ट पीटर रोड्रिग्ज, टीच अँड विन वसंतराव पाटोळे, बुलेटिन दिलीप शितोळे,आनंद बांदेकर,एम एच एम डॉ राजेश्वर उबाळे,पर्यावरण श्वेता हुले, मेम्बरशीप चेअरमन दादा साळगांवकर, हायजीन अँड सॅनिटायझेशन अनमोल गिरप या सर्व पदांचे सदस्य निवडण्यात आले.
अध्यक्ष,सेक्रेटरी सोबतच सर्व पदांचा पदग्रहण सोहळा शुक्रवार दिनांक १४ जुलै २०२३ रोजी स्वामिनी मंगल कार्यालय,पाटकर हायस्कुल नजीक वेंगुर्ला इथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रो.शरद पै यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ,झोनल को ऑर्डिनेटर प्रणय तेली,गव्हर्नर एरिया एड गजानन कांदळगावकर,असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे,असिस्टंट गव्हर्नर संजय पुनालेकर,असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.तरी सर्व समाजप्रेमींनी व जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोटरी सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे करण्यात आले आहे.