१२६ शाळांची दुरुस्ती का रखडली याची चौकशी करून अहवाल द्या
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन बैठकीत आदेश
संतोष राऊळ ( ओरोस )
छप्पर गळक्या आणि नादुरुस्त शाळा वेळेत पैसे देवून सुद्धा दुरुस्त झाल्या नाहीत या मुद्द्यावर पालकंत्र्यांनी आधिकऱ्याना चागलेच धारेवर धरले.शाळेची १२६ कामे वेगवेगळ्या निविदा आहेत. वेगवेगळ्या गावातील आहेत तरी वेळेत काम होत नाही.एकाच वेळी सर्व शाळांची कामे का सुरू केली नाहीत. यावर जिल्हापरिषद बांधकाम कार्यकारी अभियंता आवटी या संदर्भात काहीच उत्तर देवू शकले नाहीत. त्यामुळे पालकमंत्री संतापले. निवृत्तीला आलेले अधिकारी येथे आले आहेत.काहीच काम करत नाहीत.मार्च महिन्यात पैसे दिले तेव्हा तुम्ही काम का केले नाही ? विद्यार्थी भिजू नये म्हणून आमचे प्रयत्न असताना तुम्ही काहीच करत नाहीत. अधिकाऱ्यांनी “माल प्रॅक्टिस बंद करावी”. शाळांची दुरुस्ती का होत नाही.शाळेची कामे का राहिली या मागे दोषी कोण आहेत त्यांची चौकशी करून अहवाल द्या.त्यांचेवर कडाक कारवाई करा अशा सक्त सूचना पालमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी शाळा गळत असल्याने बांधकाम ची अब्रू चव्हाट्यावर आली असल्याचे सांगितले होते.त्यावेळी ही चर्चा झाली.
जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली झाली. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर,आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे,आमदार वैभव नाईक,जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,पोलीस पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे,अजित साखरे, जिल्हा नियोजन अधिकारी शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
या वेळी कार्यपूर्ती अहवाल सादर करण्यात आला.पावसामुळे ,वाऱ्यामुळे झाडे पडत असल्यामुळे वीज पुरवठा होतो. इतर वेळी सुरळीत होतो. लोड शेडींग जिल्हास्तरीय कोठेही नाही अशी माहिती विजा वितरणचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी सांगितली.८०% कर्मचारी कमी आहेत तरी काम करतो.गेल्या सरकार मध्ये फक्त आश्वासने झाली आता निधी मंजूर होतो आहे त्यामुळे साकव निर्मिती साठी आजुन निधी वाढवा म्हणजे तिन्ही मतदार संघात कमी शिक्षक प्रश्नावर उत्तर देताना,निवृत्त शिक्षक २० हजार रुपये मानधनावर घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
वैभव नाईक यांना आताच निधीचा आकडा कळू लागला आहे. अशी कोपर खळी आमदार नितेश राणे यांनी मारली.तर केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे आणि मंत्री केसरकर यांच्या आग्रहामुळे मगच्या वेळी जिल्हास्तरीय निधी मोठ्या प्रमाणात आला होतो. आता मी सर्वात जास्त निधी दिला आहे. असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. आजुन निधी द्या असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले असता आमदार नितेश राणे म्हणाले आमदार नाईक हे व्यवसायिक म्हणून निधी मागत आहेत काय ? असा सवाल करताच सभागृहात हशा पिकाला. त्याच दरम्यान लाईट गेल्यामुळे माईक बंद झाला आणि चर्चा व टोले बाजी अर्धीच राहिली.अतिवृती साठी काय तरतूद केली आहे. असे आमदार नितेश राणे यांनी विचारले. त्यावेळी ५ टक्के निधीतून खर्च केले जावू शकतात.असे उत्तर जिल्हाधिकारी यांनी दिले.
अभिंदन ठराव
अजिदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या सोबत इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांचा अभिंदन ठराव आमदार नितेश राणे यांनी मांडला.सर्वानुमते मंजूर झाला.
करुळ घाट
आज रस्त्यावर मातीनी खड्डे भरत आहेत.हे योग्य नाही.अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी लक्षात आणून दिली. यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणले,युद्ध पातळीवर हे काम करून घ्या. तरले ते गगनबावडा पर्यंत संपूर्ण रस्ता सुस्थितीत करा. एकही तक्रार नको.अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्या.अशा सूचना द्या.
मुलांना दाखले देण्यासाठी उशीर नको. यावेळी जिल्हाधिकारी सर्वर डावून असल्याचे कारण देत होते. त्यांना फटकरत पालकमंत्री चव्हाण यांनी चुकीच्या पद्धतीने बाजू मांडू नका असे सुनावले. जे दाखले मिळत नसतील त्या तहसीलदार वर कारवाई करनार. ७१४ दाखले प्रलंबित आहेत. हे दाखले का ठेवले. ६ महिन्यांनी हे दाखले देत असाल तर उपयोग काय ? शासनाने जीआर का काढला. कारण महसूल अधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांनी दाखले देण्यास वेळ लागत आहेत म्हणून ही स्थिती आहे.यापुढे दाखल्यांच्या तक्रारी येता नये अशा सक्त सूचना दिल्या.पर्यटन आराखडा आणि जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र निवुक्ती द्या. अशा सूचना दिल्या.