स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक उलाढालीत कमालीचे सातत्य

आर्थिक संस्थेच्या सुरक्षिततेचे सातत्य हे द्योतक – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्वरूपानंद पतसंस्थेच्या ३३ वर्षाच्या वाटचालीचा अभ्यास केला तर स्वामी स्वरूपानंदच्या प्रतिवर्षीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कमालीचे सातत्य व प्रमाणबद्धता आहे.

परिपूर्ण व प्रमाणबद्ध व्यवहार
ठेवींमध्ये होणारी वाढ ही कधीच अवास्तव जास्त नाही किंवा गतवर्षीच्या तुलनेत कमीही नाही. पतसंस्थेचे ठेव व्याजदर हेही पूर्ण नियंत्रणातील असतात. अवास्तव जास्त दर देऊन ठेवीदारांना आमिष दाखवून स्वरूपानंदने कधीच ठेवीदारांना प्रभावित केले नाही. आयकर मर्यादेच्या बाहेर जाऊन कधीच रोख व्यवहार केले नाही. अगर आयकर मर्यादेचे बाहेर जात कधीच रोखीने पेमेंट केले नाही. पॅनकार्ड, आधार कार्डसकट सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता स्वरूपानंद जाणीवपूर्वक पूर्ण करून घेत आली.
वाढता नफा व नफ्याचा योग्य विनियोग
स्वरूपानंदचा निव्वळ नफा ही सातत्याने वाढता राहिला. गेली १० वर्ष १ कोटी पेक्षा जास्त नफा कमवताना कोठेही नफा खोरी न करता निधी व्यवस्थापन आणि निधीचा पूर्णांशाने उपयोग करत सातत्याने उत्पन्न वाढते ठेवले, वसुली जवळपास पूर्णांशाने केल्याने संस्थेला चांगला लाभ होत राहिला. झालेल्या नफ्यातून ५०% च्या आसपास रक्कम स्वनिधी म्हणून एकत्र करत स्वनिधी वाढवत नेऊन संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली.
उत्तम आर्थिक प्रेझेंटेशन
स्वरूपानंद पतसंस्थेने कॅश रिझर्व्ह रेशो, सॅटयुटरी लिक्विडिटी यांचे तंतोतंत्र पालन केले. संस्थेचा सी.डी रेशो सातत्याने प्रमाणात ठेवला. या सर्वांमुळे संस्थेचे आर्थिक प्रेझेंटेशन नेहमीच उत्तम राहिले. त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता खूप वृद्धिंगत होत गेली.
विश्वासार्हता जपत संस्थेने निर्माण केलेली स्वतंत्र ओळख
आर्थिक व्यवहारांना शिस्तीचे कोंदण महत्त्वाचे असते ते स्वरूपानंदच्या प्रत्येकाने कसोशीने पाळले. विश्वासार्हता ही सामूहिक असावी लागते. स्वरूपानंदचा प्रत्येक घटक विश्वासार्हतेला सातत्याने जपत आला. याचबरोबर उत्तम ग्राहक सेवा, नव तंत्रज्ञानाचा उपयोग करत पतसंस्थेची स्वच्छ प्रतिमा दिवसेंदिवस अधिक चमकत गेली. एक उत्तम टीमवर्क करत स्वरूपानंद पतसंस्थेने आपली स्वतंत्र ओळख करून दिली.
या पार्श्वभूमीवर संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा होतात. आज केवळ १९ दिवसात स्वरूपानंदच्या ठेव वृद्धीमासात रुपये ९ कोटी ठेवी जमा झाल्या. २७२ कोटींची वेस ओलांडत या ठेववृद्धी मासात समाप्ती होण्यापूर्वी २७५ कोटी ठेवींचा टप्पा स्वरूपानंद पार करेल असा विश्वास व्यक्त करताना ठेवीदारांनी स्वरूपानंदच्या विविध ठेव योजनेत मोठी गुंतवणूक करावी असे विनम्र आवाहन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.