सेवा निवृत्त शिक्षकाना बोलावून केला सन्मान
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने गुरुपर्णिमा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली. सेवानिवृत शिक्षकना निमंत्रित करुन त्यांचा सन्मान केला. सदर कार्यक्रमात र. ए. सोसायटी कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी संस्थेने वर्षभरात केलेल्या विविध कामांचा आढ़ावा घेतला. यामधे गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त झाले असल्याची माहिती दिली. नवीन योगा हॉलचे काम प्रगतीपथावार असून महाविद्यालयांच्या नवीन इमारतीचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि महाविद्यालयाची रु.12 कोटींची नूतन वास्तू येत्या दोन वर्षात पूर्ण करणार; त्यासाठी देणगी मिळणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच 25 वर्षाची मालतीबाई जोशी प्राथमिक शाळा 20% अनुदानवर आल्याचे नमूद करुन अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयातील 5 वी तुकडी 20%अनुदानावर आली आहे यामुळे 12 शिक्षक क़ायम सेवेत आले असून यापूर्वी 5 शिक्षक कायम सेवेत असल्याची माहिती दिली. सौ. अनघा चितळे यांनी दिलेल्या 5 लाखाच्या देणगीतुन विद्यार्थिनींच्या वस्तीगृहतील 7 नवीन खोल्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. विकासची अनेक कामे आता मार्गी लागत असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
श्री. शेवड़े यांनी सेवानिवृत शिक्षकाबदल कृतज्ञता व्यक्त करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष झाला तो आपल्यासारख्या शिक्षकांच्या मेहनतीने हे आम्ही पदाधिकारी कधीच विसरणार नाही असे सांगून मान्यवरांच्या हस्ते सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी र. ए सोसायटीचे डॉ. चंद्रशेखर केळकर श्री. मनोज पाटणकर, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते. माजी शिक्षकांपैकी 90 वर्ष वय असलेल्या जोग मॅडम, सुर्वे मॅडम, श्री. नाथूराम देवळेकर, प्रा. सुशील वाघधरे, प्रा. जी. एस कुलकर्णी, डॉ. मंगल पटवर्धन,श्री. एन. जे पाटील डॉ. राजीव सप्रे, प्रा. अशोक पाटील, डॉ. वामन सावंत, प्रा. माणिक बाबर, प्रा. भिंगारदिवे, प्रा हिराजी शेजवळ, प्रा अनिल उरुणकर असे सुमारे 25 सेवानिवृत शिक्षक उपस्थित होते. संस्थेने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अगत्याने आपली आठवण करुन सन्मानाने निमंत्रित केल्याबदल उपस्थित उपस्थित माजी शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.