उद्धव ठाकरे तू तर मर्दानगीवरच कलंक..! ; भाजप नेते आमदार नितेश राणे संतापले

श्री देव रामेश्वर ची शपथ घेवून बाळासाहेबांच्या बद्दल उद्धव ठाकरे कसे वागले ते केले उघड

८ जूनला पांचोलीच्या घरी लहान मुलांना का आणले याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावे

अन्यथा फोटो, व्हिडिओ माझ्याकडे आहेत उघड करू, दिला इशारा

आदित्य म्हणजे ठाकरे नावावर कलंक,आमदार राणे यांचा घनाघात

आदित्य जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे यांचा थयथयाट

संतोष राऊळ ( कणकवली ) आमचे दैवत असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे हा माणूस प्राण्याची उपमा देवून हाक मारत होता. हे मी श्री देव रामेश्वर देवतेची शपथ घेवून खरं सांगतो.बाळासाहेबांना औषधे,खायला पोटभर अन्न सुद्धा देत नव्हतसा. हे प्रकार पाहिल्या नंतर उद्धव ठाकरे तूतर मर्दानगीवरच कलंक आहेस.अशी घनाघाती टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे फार मोठे प्रताप समोर आले आहेत. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत,पांचोली च्या घरी लहान मुले आणण्याचा प्रकार,कोरोना काळातील भ्रष्टाचार अशा अनेक प्रकरणात आदित्य जेलमध्ये जाणार आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा थयथयाट सुरू झाला आहे असा आरोप केला. यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका कराल तर मातोश्रीत काय घडते आहे हे आम्हाला माहित आहे. त्याच बरोबर पांचोलीच्या घरात लहान मुलांना का आणले होते, कोणत्या एनजीओ त्यांना घेऊन आलेली होती. आणि काय आणलं होतं ? याचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे प्राप्त आहेत वेळ पडली तर तेही बाहेर काढू असा इशारा भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला. आमदार राणे म्हणाले,आता पर्यंत उद्धव ठाकरे हा व्यक्ती सुस्कृत,कुटुंब वत्सल वाटत होता.
त्याने कितीही टीका केली तरी काही एच.एम. व्ही पत्रकार लोकांना त्यांची जीभ घातली असे कधीच वाटत नाही.आम्ही जर अशी टीका केली तर आमचे संस्कार काढले जातात.अशा लोकांनी उद्धव ठाकरे यांचे संस्कार पाहावेत.कलंक,फडतूस, मुख्यमंत्र्यांच्या छोट्या नातवाला राजकारणात ओढणे,बाबरी मशीदवर फडणवीस बसले म्हणून ती पडली अशी टीका करणे, ही भाषा सुसंस्कृतपणाची आहे का असा सवाल करत आमदार नितेश राणे म्हणाले उद्धव ठाकरे सारखा बेशरम माणूस, जो स्वतःच्या भावाला, वडिलांना,त्रास दिला.असा दुसरा होणे नाही. राजकारणात भाषेचा स्तर यात उद्धव ठाकरेंनी रसातळाला नेलेला आहे व्याजासहित त्याची परतफेड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी आमदार राणे यांनी दिला.
रामेश्वर देवतेची शपथ घेवून सांगतो बाळासाहेबांना प्राण्याची उपमा देवून हाक हा माणूस मारत होता. औषधे,खायला पोटभर अन्न देत नव्हतास. तू तर मर्दपणावर कलंक आहे.अशी टीका केली. हिम्मत असेल तर कलानगर मध्ये येतो तू दाखव मर्दांगी. तुझे प्रोटेक्शन संरक्षण बाजूला कार्ड आम्ही तिथे येतो आणि समोरासमोर येऊन मर्दानगी गाजवून दाखव असे आव्हानच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.
तुझा मुलगा आदित्य कलंक आहे.आठ जूनला पांचोली च्या घरी लहान मुल का आणली होती. याचे उत्तर द्या. प्रबोधनकार ठाकरे,बाळासाहेब ठाकरे पासून राज ठाकरे पर्यंत जे नाव समाजात,जनतेत कमावले होते ते घालवले आहे. तुझा आदू बाळ लवकरच जेल मध्ये जावून कलंक पुसणार आहे.आणि याची माहिती असल्यामुळेच म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा थयथयाट सुरू झाला आहे. अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली.

मातोश्री २ मध्ये आता कोणाला प्रवेश नाही. त्याला शासकीय परवानग्या, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.त्यावेळी ठाकरेनचे सर्व लाड फडणवीस याच्या यांनी पुरविले.आज तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलत आहे ते पहा.आम्ही ३९ वर्षे तेथे होतो त्यामुळे मातोश्री मध्ये काय चालते आणि काय होते याची माहिती आहे.त्यामुळे यापुढे फडणवीस साहेबांवर खालच्या पातळीवर जावून टीकातर मातोश्रींमधील सर्व अंडी पिल्ली बाहेर काडु असा इशारा यावेळी दिला.
काजोलची प्रंशा करता मग कंगना राणावत,सुशांतसिंग राजपूत यांची काय चूक होती. संजय राऊत यांच्या मालकाचे जेव्हा जेव्हा कोणी विरोधात बोलला तेव्हा त्याचे घर पडले तरी किंवा त्याचे इतर काहीतरी झालेले आहे.
२०२१-२०२२ मध्ये ठाकरे राज्य होते. त्यामुळे राज्य मगले .सरकारने नालायक आणि नामर्द लोकांना पोलीस संरक्षण काढावे अशी मागणी केली.
अमित शाह साहेबांच्या शब्दावर देशाचा विश्वास आहे. उद्धव ठाकरे हा कोणाचा झालेला नाही.याला मुख्यमंत्री व्हायचे होते. बायकोच्यास्वप्नपूर्ती साठी तो खोटे बोलत होता. ९९ पासून हेच चालू आहे.
राजकारणातील स्थर उद्धव ठाकरे यांनी घसरलेला आहे याची परतफेड व्याजासहित केले जाईल असा इशाराही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.