देऊ तो शब्द पूर्ण करणारे आमदार नितेश राणे..

आरोग्य सेवा दर्जेदार होण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मुंबईतून आणले १२ कर्मचारी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास पुरेसा कर्मचारी वर्ग सेवेत झाला रुजू

रुग्णांना आता केस पेपर काढण्यासाठी, औषधांसाठी, तिष्ठत राहावे लागणार नाही

संतोष राऊळ ( कणकवली ) कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार मिळावी यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कमी असलेला कर्मचारी वर्ग आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विषयक ज्ञान असलेले प्रशिक्षित तब्बल १२ कर्मचारी मुंबई येथील संस्थेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी रुजू केले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली त्यांचे स्वागत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर धर्माधिकारी यांनी केले. दरम्यान आमदार नितेश राणे म्हणजे देऊ तो शब्द प्रमाण मानून तो पूर्ण करणारे आमदार म्हणून पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तालुक्यासह वैभववाडी, देवगड ,मालवण, कसाल, आब्राड, सोनवडे अशा भागातील अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. सकाळची रुग्ण तपासणी नऊ वाजल्यापासून सुरू होते.दर दिवशी ५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याने सहाजिकच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे एकूणच सेवेवर परिणाम होऊ लागला.आरोग्य तपासणी करण्या च्या पूर्वी केस पेपर काढण्यासाठी रांगा लागू लागल्या. औषधे घेण्यासाठी रांगा लागू लागल्या. रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णाला सेवा देण्यासाठी कर्मचारी कमी पडू लागले त्यामुळे गैरसोय म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय असे समज रुग्णांची होऊ लागली त्यांची हेळसांड होऊ लागली. कमी स्टाफ मुळे आहेत या कर्मचाऱ्यांवर अधिकचे काम करण्याची वेळ आली आणि या सर्वच गोष्टीमुळे सेवा नीट पणाने चालेल अशी झाली. या सर्व बाबी लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना सेवेसाठी तिष्ठत राहावे लागते हे आमदार नितेश राणे यांच्या लक्षात आले. आपण राज्यात सत्तेत आहोत आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसारखी कारणे देत बसू नये या स्वभावाचे आणि विचारांचे असलेले आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्न जाणून घेताना कोणत्या अपेक्षा आहेत यावर चर्चा ते कशा पद्धतीने सोडवता येतील यावर आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयाचे अधिक्षक व प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर मुंबई स्थित आरोग्य विषयक सेवा सुविधा देणाऱ्या एनजीओच्या माध्यमातून बारा कर्मचारी ज्यांना आरोग्य विषयक ज्ञान आहे, रुग्णालयातील कामाचा अनुभव आहे.असे कर्मचारी आमदार नितेश राणे यांनी देण्याचा शब्द दिला होता आणि ते कर्मचारी आज ११ जुलैपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सेवेसाठी हजर झाले आहेत.