पिरावाडी हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप

आचरा | अर्जुन बापर्डेकर : श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा पिरवाडी या प्रशालीच्या कैवि स कुबल सभागृहात विद्यार्थी गुण गौरव सोहळा श्री तरुण संघ दक्षिणवाडा संघाचेअध्यक्ष दिनानाथ धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी मुरलीधर कोळंबकर, प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश परुळेकर,मुजफ्फर मुजफ्फर , शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कोळंबकर ,नारायण कुबल ,मनोज वाडेकर पां डुरंग वायंगणकर मुख्याध्यापक रणजीत बुगडे व इतर शिक्षक कर्मचारी पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दहावी मधील विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला .यावेळीजयप्रकाश परुळेकर यांच्याकडून आठवी नववी दहावी मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला .सुविधा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई वसंत दिनकर मेस्त्री यांच्या स्मरणार्थ प्रकाश मेस्त्री यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांस छत्र्या वाटप करण्यात आल्या तसेच मुजफ्फर मुजावर यांच्याकडून प्रशालेत शैक्षणिक साहित्या साठी रोख दहा हजार रुपये मदत केली गेली.