राजापूर (वार्ताहर): यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यामार्फत सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (बी. लिब.) या परिक्षेत येथील नगर वाचनालय राजापूर येथे सहाय्यक ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या सौ. पद्मजा प्रेमप्रकाश कारेकर या 75 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर त्यांनी या परिक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.
घरसंसार आणि ग्रंथालयीन कामकाजाची जबाबदारी सांभाळून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नगर वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर, कार्यवाह मदन हजेरी, संचालक मंडळ व सहकारी कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले आहे.
तर सौ. कारेकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल यांचा तसेच गतवर्षी ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नगर वाचनालयाच्या लिपिक दिपीका गजानन पवार यांचाही नगर वाचनालयाचे वतीने अध्यक्ष देवदत्त वालावलकर यांनी गुलाब पुष्प देवून सत्कार केला.
याप्रसंगी कार्यवाह मदन हजेरी, संचालक डॉ.अभय अळवणी, ग्रंथपाल सुहास ओळकर, शिपाई अनिकेत नाडणकर आदी उपस्थीत होते.
फोटो-सौ. पद्मजा कारेकर
Home महाराष्ट्र रत्नागिरी नगर वाचनालय राजापूरच्या सहा. ग्रंथपाल पद्मजा कारेकर बी. लिब. परिक्षेत जिल्ह्यात तृतीय