विश्रांती घेऊन दोन दिवसांनी पुन्हा मुसळधार!

रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पाऊस संमिश्र राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळाकडून वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये 11 आणि 12 जुलै च्या कालावधीत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. मात्र 13 जुलैपासून सिंधुदुर्ग आणि 14 जुलैपासून रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.