राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी बुधवार 12 जुलै रोजी निवडणुक कार्यक्रम घोषीत झाला आहे.
संस्थेच्या मुख्य कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणे व त्यापुढील प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री. कांबळे काम पाहणार आहेत.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी होणारी निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असून उपाध्यक्षपदी नवा चेहऱ्याला संधी मिळते कि विद्यमान उपाध्यक्ष बाळ तांबे यांना पुन्हा संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.