मंजूर सागवे विज उपकेंद्राचे रखडलेले काम मार्गी लावावे

भाजपा पदाधिकाऱ्यांचे उल्का विश्वासराव यांना निवेदन

राजापूर (वार्ताहर): जागेअभावी रखडलेल्या सागवे 33/11 केव्ही सब स्टेशनचे कामाला निधी उपलब्ध करून हे काम मार्गी लावावे अशी मागणी सागवे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ. उल्काताई विश्वासराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सागवे येथे 33/11 केव्ही सबस्टेशन मंजूर होवून बरेच दिवस झाले आहेत. यासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे. यासाठी संबंधीत खात्याने सागवे येथे पाहणी करून जागांची पहाणी केली आहे. यासाठी येथील पाच ते सहा जमीन मालकांनी येथील सध्याचे बाजारभावाप्रमाणे आपली मागणी संबंधीतांकडे सादर केली आहे. परंतु संबंधीत खाते येथे सरकारी जागेच्या शोधात आहे असे कळते. परंतु सागवे ग्रामपंचायत हद्दीत त्याना लागणारी एवढी सरकारी उपलब्ध नाही.
सध्याच्या परिस्थीतीत कुंभवडे, नाणार, सागवे या परिसरात कोंडये येथुन लाईन येते. या केंद्रांतर्गत चार हजार विज ग्राहक आहेत. येणारी लाईन ही झाडी झुडपातून येते. या लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असल्याने या लाईनची देखभाल दुरूस्ती करणे मोठे जिकीरीचे व अवघड होवून बसले आहे.
कोंडये येथुन आलेल्या लाईनवरील सर्व परिस्थिती पाहता येथील ग्राहक गेली दहा वर्षे कमी दाबाने होणारा विजपुरवठा, लोडशेडींग, चार पाच दिवस विज पुरवठा खंडीत असणे, पाऊस वादळात लाईल जाणे, सतत लाईन नादुरूस्त होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक व व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे या मंजूर विज सबस्टेशनला जागा संपादित करून ते कार्यान्वीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसे निवेदन सौ. विश्वासराव देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, युवा अध्यक्ष जब्बार काझी, सागवे विभाग युवा अध्यक्ष देवा भोसले, उपाध्यक्ष विनायक कुवेसकर, माजी सरपंच विद्याधर राणे, शक्ती केंद्र प्रमुख मिलिंद देवधर, बुथ प्रमुख साहील गुरव,संकेत मयेकर, महेश बोटले, पवन पाटकर, सुर्यकांत पुजारी, हमीद काझी, रोहन मयेकर आदी उपस्थीत होते.
फोटो 11 आरजेपी 1
सागवे 33/11 केव्ही सब स्टेशनचे कामाला निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन भाजपाच्या विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ. उल्काताई विश्वासराव यांना देताना सागवे विभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते.