कणकवलीत मॅजिक आणि तवेरा कार मध्ये अपघात…!

Google search engine
Google search engine

मॅजिकच्या दर्शनी भागाचे झाले नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली I मयूर ठाकूर : कणकवली बस स्थानकाच्या दिशेने मॅजिक चालली होती. अशातच कणकवली तहसीलदार कार्यालयाकडून तवेरा कार ओव्हरब्रिज खालून बस स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी टर्न घेत असताना हा अपघात झाला. अपघातात मॅजिकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

 

Accident between Magic and Tavera car in Kankavli...!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अपघातांच्या बाबतीत कणकवली हे नेहमी चर्चेत राहिलेल्या शहर आहे. हायवे ठेकेदाराचा निष्काळजीपणा वारंवार वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे, असे असताना आज दुपारच्या सुमारास कणकवली येथे प्रवाशांना घेऊन जाणारी मॅजिक गाडी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आली असता तहसीलदार कार्यालयाकडून जाणाऱ्या तवेरा कार चालकाने सर्विस रस्त्यावर अचानक टर्न घेतल्यामुळे मॅजिक गाडी तवेरा कारला मागावून धडकली. यात मॅजिक चे मोठे नुकसान झाले. अशा प्रकारचे अपघात कणकवलीत काही ठिकाणी होतच असतात. परंतु आवश्यक तिथे गतिरोधक नाहीत, आवश्यक तिथे आरसे नाहीत त्यामुळे मागून – पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज सर्विस रस्त्यावर येताना येत नाही. अशातच हे अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

हायवे ठेकेदार व प्राधिकरणाने शासकीय कार्यालयांजवळ गतिरोधक व आरशांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येईल व अपघात टाळेल.