रत्नागिरी : जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी येत्या १८ जुलै रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे.
यामध्ये निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व त्यांचे संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन, जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.