प्रा. जयवंत पाताडे यांना “छत्रपती शाहू विचार पुरस्कार

 

खेड(प्रतिनिधी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर या ऐतिहासिक नगरीमध्ये मुक्ता फौंडेशनच्या वतीने भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाचे प्रा. जयवंत पाताडे यांचा “छत्रपती शाहू विचार पुरस्कार २०२३” हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हा।पुरस्कार जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा. श्री. बी. एम. हिर्डेकर यांच्या शुभहस्ते फेटा, शाल व सन्मानचिन्ह देवून प्रदान करण्यात आला.

प्रा. जयवंत पाताडे हे भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात इतिहास विषयाचे
प्राध्यापक आहेत. प्रा. जयवंत पाताडे यांनी शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या
उल्लेखनीय कार्याची मुक्ता फौंडेशन, कोल्हापूर यांनी दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान
केला आहे. या पुरस्काराने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या
निमित्ताने संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे साहेब, सहसचिव मा. श्री. द. भि. धुमक सर,
खजिनदार मा. श्री. राजाभाऊ बैकर साहेब, संस्था सदस्य मा. बाबाराम तळेकर साहेब, संस्था
सदस्य मा. श्री. दत्ताशेठ बैकरसाहेब, प्राचार्य व्ही. एन. साळुंखे व सहकारी प्राध्यापक वर्गाने
अभिनंदन केले