सर्व सरकारी यंत्रणेने आपसापसात समन्वय ठेवून काम करावे व नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिल्या
आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली देवगड तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज पार पडली या बैठकीला तहसीलदार करिष्मा नायर उपनगराध्यक्ष सावंत देवगडचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब , देवगड जामसांडे नगरपंचायतीचे सीओ संतोष जिरगे उपस्थित होते
देवगड फाटक क्लास येथे साठणाऱ्या गटाराच्या पाण्याचे तातडीने विसर्ग होईल अशी व्यवस्था करा अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम ला दिली आहे गटार काढण्यासाठी स्थानिक व नगरपंचायत प्रशासन सहकार्य करत नाही अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम ने केली मात्र शिवसेनेचे पदाधिकारी विलास साळस्कर यांनी तातडीने याबाबतचे अतिक्रमण काढण्याची गरज असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सांगितले यावर अतिक्रमण काढा अशा सूचना देवगड जाम संडे नगरपंचायतीचे संतोष जिरगे यांना दिल्या
त्याच्या काळात कोणत्याही शालेय फेऱ्या बंद करू नका अशा सूचनाही आमदार नितेश राणे यांनी एसटीला दिले आहेत प्रवाशांच्या तक्रारीकडे तातडीने लक्ष द्या असेही त्यांनी सांगितले
शेतकऱ्यांना बी बियाणे व खते याचा व्यवस्थित पुरवठा करा पशुवैद्यकीय व आरोग्य या विषयांमध्ये औषधाचा पूर्ण पुरवठा करा कोणतीही अडचण असल्यास तातडीने माझ्याशी संपर्क करा अशी सूचनाही आमदार नितेश राणे यांनी दिली आहे महावितरण चे काम देवगड तालुक्यात चांगली असल्याबद्दल त्यांनी बैठकीत समाधान व्यक्त केले पुढील अधिवेशनात तरळे येथील खारबंधारे खाते देवगडला आणण्याबाबत कार्यवाही करू तसेच तेथे पदे रिक्त आहेत तेथे ती भरण्याबाबत कार्यवाही करू असे आश्वासनही आमदार नितेश राणे यांनी दिले आहे यावेळी सर्व खाते प्रमुख उपस्थित होते