वेंगुर्ले : प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्वीकृत सदस्यपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांना पाठवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी उद्योगधंद्या संदर्भात भेडसावणे विविध प्रश्न तुम्ही संघटनेच्या माध्यमातून मांडावे आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे नमूद केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.