रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुलाच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार 9 जुलै रोजी 8 ते 8.30 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
प्रथमेश संतोष संसारे (30),करण अर्जून गोसावी (29,दोन्ही रा.रत्नाागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.रविवारी रात्री शहर पोलिस शहरात गस्त घात असताना प्रमोद महाजन क्रिडा संकुलच्या शेजारी जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर हे दोघे दारुच्या नशेत असताना पोलिसांनी कारवाई केली.त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home महाराष्ट्र रत्नागिरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा