रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप येथे बेकायदेशिरपणे गावठी दारुची विक्री करण्यासाठी आपल्या जवळ बाळगणार्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सेामवार 10 जुलै रोजी सायंकाळी 7.25 वा.करण्यात आली.
अनिल महादेव पावसकर (54,रा.गोळप,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.सोमवारी सायंकाळी पूर्णगड पोलिस गोळप परिसरात गस्त घालत असताना त्यांना पर्शुरामनगरकडे जाणार्या रस्त्यावरील पाखाडीच्या धक्कयाच्या बाजुला संशयित 670 रुपयांची 12 लिटर दारु आपल्या जवळ बाळगून असलेला मिळून आला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.