महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले निवडीचे पत्र
मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या कार्यकारिणी समितीच्या आमंत्रित सदस्यपदी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनार भिंगार्डे आणि स्वीकृत सदस्यपदी पराग पानलवकर यांची निवड झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
महाराष्ट्र चेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून भिंगार्डे आणि पानवलकर यांची निवड झाल्याने उद्योजक, व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अधिक माहिती देताना चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, राज्यातील व्यापार, उद्योग व कृषीपूरक उद्योगाची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्र चेंबरतर्फे `व्हिजन २०२७` हा महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप बनविला आहे. त्या माध्यमातून योजनांच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी समितीवर संधी देण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या व्यापार आणि उद्योग वृद्धीसाठी गेल्या ९५ वर्षापासून महाराष्ट्र चेंबर सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील विविध व्यापार आणि उद्योगांतील ८५० संस्थातील आणि ७ लाख उद्योग आणि ३० लाखांहून अधिक व्यापार संघटनेची शिखर संस्थेचे प्रतिनिधीत्व करण्याची धुरा महाराष्ट्र चेंबर सांभाळत आहे.
आमंत्रित सदस्यपदी निवड झालेले गणेश भिंगार्डे हे रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत. चार वर्षापासून त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. या कालावधीत व्यापारी बंधूच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे. स्वीकृत सदस्यपदी पराग पानलवकर रत्नागिरी येथील लायन्स क्लबचे सक्रिय सभासद आहेत. अनेक बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यासह रत्नागिरी शहर व्यापारी महासंघात सक्रियपणे कार्यरत आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. संस्थेकडून सोपविल्या जाणारी जबाबदारी पार पडण्याची ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली.