लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांची ओटवणे मंदिराला भेट

निमीत्त “गाभाऱ्याचे गाणे” सिरीज 

ओटवणे(प्रतिनीधी) २००९मध्ये झी मराठी वाहिनीवरील प्रसारित झालेल्या सारेगमप लिटिल चॅम्प च्या कार्यक्रमातून घरोघरी पोहोचलेला आणि अंतिम पाच मध्ये स्थान मिळविलेला रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली येथिल प्रथमेश लघाटे आणि तिची सहकारी मुग्धा वैशंपायन यांनी ओटवणे रवळनाथ मंदिराला भेट देत मंदिराचा इतिहास आणि देवस्थान विषयी जाणून घेतले. भेटीचं निमीत्त होत मुग्धा वैशंपायन हिच्या गाभाऱ्यातील गाणं या सिरीजच.या सिरीज साठी आणि प्रथमेश लघाटे याच्या शिव श्रावणी या सिरीज साठी सध्या मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे विविध पुरातन ऐतिहासिक मंदिरांना भेट देत मंदिर, मंदिराचा परीसर शूट करत आपल्या सिरीज च्या माध्यमातून मंदिरांचा इतिहास आणि पुरातन मंदिराचा अनमोल ठेवा प्रेक्षकांसमोर आणत आहेत. यावेळी त्यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त करत आपण देवस्थानचा अनमोल ठेवा प्रेक्षकांसमोर मांडत अस ताना आपल्याकडून देवाची ख्याती महती सर्वत्र पोचते हे आपलं भाग्य असून देवाची गाण्यातून गीत रुपी सेवाही घडावी यासाठी शेवठी गायन केले जाते व समाप्ती केली जाते रवळनाथ मंदीर येथेही गीत गावून शूटिंगचा समारोप झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंदीर परिसरात उपास्थित होते. प्रेक्षकांना आवाहन करताना आपल्या मंदिरांचा इतिहास पाहता यावा सर्व दूर पोचावा यासाठी आपल युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करा असेही आवाहन केले. देवस्थानच्या वतीने देवस्थान प्रमुख रवींद्रनाथ गावकर यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.