डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर देणार राणी जानकीबाईसाहेब सुतिकागृहात सेवा 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : 

आपल्या प्रदीर्घ सेवेने जिल्हाभरातच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यांसह गोमंतकातही प्रसिद्धीस पावलेले गरीबांचे देवदूत डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर निवृत्त झाल्यानंतर आता सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित राणी जानकीबाईसाहेब सुतिकागृह येथे मानद चिकित्सक म्हणून आपली सेवा देणार आहेत. बाह्य रुग्ण विभागासोबतच

गरजू रुग्णांची प्रसुती, व इतर आवश्यक शस्त्रक्रिया देखील ते या रुग्णालयात करणार असून ते आपली सेवा गुरुवार १३ जुलै पासून देणार आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांची सेवा घडावी या उददेशाने राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थचे मा. अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, विश्वस्त डॉ. मिलीद खानोलकर यांचे सह समस्त संचालक मंडाळाच्या आग्रहास्तव डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे सार्वजनिक सुट्टी वगळता दररोज सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यत आपली सेवा भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयच्या बाहयरुग्ण विभागात देणार आहेत. तसेच गरजू रुग्णांची प्रसुती, व इतर आवश्यक शस्त्रक्रिया देखील ते या रुग्णालयात करणार आहेत.

हे रुग्णालय हे सन १९२९ पासून जिल्हयातील स्त्री रुग्णांची सेवा करीत आहे. या रुग्णालयात जिल्हयाचे प्रसिदध स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर आता सेवा देणार आहेत. तरी गरजू रुग्णांना आवाहान करण्यात येते की, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.