रत्नागिरी : मत्स्यशेती हा विषय आपल्याकडे नवीन आहे.मागील दहा वर्षापासून गोड्या पाण्यातील मत्स्य शेती ही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश,झारखंड उत्तराखंड इत्यादी सर्व उत्तरेच्या राज्यात सुरू झालेली आहे. तथापि मत्स्यशेतीविषयी योग्य आणि खरी माहिती मत्स्य शेतकऱ्याला अद्यापही उपलब्ध होत नव्हती. ही अडचण या पुस्तकामुळे दूर झाली आहे.रत्नागिरीचे भूतपूर्व अधिष्ठाता मत्स्य महाविद्यालय डॉ. विजय जोशी यांनी हिंदीमध्ये लिहिलेले पुस्तक मिठे जल मे मछली पालन संपुर्ण मार्गदर्शिका हे खरोखरच हिंदी भाषिक मत्स्य शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकते. कारण मत्स्यशेतीविषयी समग्र आवश्यक ती माहिती या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत दिलेली आहेत. पुस्तकात अनेक योग्य चित्रे आहेत ज्याद्वारेही मत्स्य शेतकऱ्याचे ज्ञान वाढू शकते.तेव्हा असे हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे.महाराष्ट्राच्या बाहेरच नव्हे तर महाराष्ट्रातील मत्स्य शेतकऱ्यानी सुद्धा हे पुस्तक विकत घेऊन आपल्याकडे वाचावे आणि त्याचा अभ्यास करून यशस्वीपणे मत्स्यशेती करावी.
नवचैतन्य प्रकाशन,मुंबई यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आणि या पुस्तकाचा विमोचन सोहळा दिनांक 2 जुलै 2023 रोजी रत्नागिरी येथे ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाला मत्स्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सौ.सुनेत्रा जोशी यांनी एक शाम मीठे जल मे मछली पालन पुस्तक के नाम.पढेंगे अगर मछली पालक इस पुस्तक को परेशानिया होगी दूर बन जायेगा काम” अशा शब्दात व्यक्त केले.
याप्रसंगी मत्स्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना लेखक डॉ.विजय जोशी यांनी या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली. या सोहळ्याच्या वेळी अनेक मान्यवर कार्यक्रमाला हजर होते. याप्रसंगी बोलताना साताऱ्याचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री. किरण जोशी म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे मत्स्य शेतीचे बायबल आहे.या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून सकाळ उद्योगसमूहातील एस आय आय एस सी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख श्री.अमोल बिरारी उपस्थित होते. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, डॉ. जोशी यांचा एस आय एस सी आणि सकाळ समूह यबरोबर मागील वीस वर्षाचा ऋणानुबंध आहे.अनेक प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. मत्स्य क्षेत्राचा ४० वर्षाचा त्यांचा गाढा अनुभव लक्षात घेता, हे पुस्तक अतिशय सखोल आणि मासे शेतकऱ्याला सोप्या भाषेत मत्स्य शेतीची माहिती देणारे असे उपलब्ध झालेले आहे.तसेच आतापर्यंत हिंदी मध्ये अशा प्रकारचे पुस्तक नव्हत.हे पुस्तक हिंदी मध्ये असल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,उत्तराखंड झारखंड, पश्चिम बंगाल इत्यादी सर्व प्रांतांमधील मत्स्य शेतकऱ्याला ते अतिशयय उपयोगी ठरेल.
आणि मत्स्य शेतकऱ्यांनी ते अवश्य खरेदी करावे.तसेच मी त्यांना एवढे त्यांना हे एवढे चांगले पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो,आणि पुस्तकाला अधिकाधिक लोक वाचतील शुभेच्छा व्यक्त करतो.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे नाबार्ड उत्तराखंडचे प्रमुख चीफ जनरल मॅनेजर श्री विनोदजी बिष्ट यांनी सांगितले की,पुस्तक अत्यंत साध्या भाषेत आहे तसेच मत्स्य शेतकऱ्याला असणाऱ्या सर्व शंका यातून दूर होतात.आत्तापर्यंत हिंदी भाषेमध्ये मत्स्यशेती विषयक समग्र माहिती एकत्रित ठिकाणी देणारे असे पुस्तक उपलब्ध नव्हते.ते यामुळे उपलब्ध झाले आहे. आणि याचा उपयोग केवळ मत्स्य शेतकरीच नाही तर,मत्स्य विषयक शिकणारे विद्यार्थी,मत्स्य अधिकारी ,बँक अधिकारी या सर्वांना होईल आणि म्हणून सर्वांनी हे पुस्तक अवश्य खरेदी करावे. विशेषतः उत्तर भारतामध्ये मत्स्य शेतकऱ्यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरू शकते.यावेळी संभाजीनगरवरून डॉ.प्रथमेश जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले, की हे पुस्तक मत्स्य शेतीविषयी समग्र माहिती देणारे तर आहेच पण एवढेच नव्हे तर डॉक्टर विजय जोशी यांच्या ४०वर्षाच्या मत्स्य शेतीतील तसेच मत्स्यशिक्षणातील प्रदीर्घ अनुभवाचे सार आहे.
याप्रसंगी डॉ.त्रिवेदी डायरेक्टर ऑफ फिशरीस ,उत्तराखंड ,श्री.प्रमोद कुमार शुक्ला डेप्युटी डायरेक्टर ऑफ फिशरीस, उत्तराखंड. याचबरोबर श्री.अभय देशपांडे डेप्युटी डायरेक्टर फिशरीस, महाराष्ट्र.श्री. पाठक डीजीएम नाबार्ड हे सर्व मान्यवर उपस्थित होते. तसेच या सर्व प्रांतांमध्ये या पुस्तकाचा प्रचार करण्याचे त्यांनी ठरविले आहे असेही सांगितले.श्री पाठक यांनी सांगितले की हे पुस्तक बँक अधिकाऱ्यांनाही प्रोजेक्ट ॲपरायसल करताना अतिशय उपयुक्त आहे.बँक अधिकारी, मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी या सर्वांनी हे पुस्तक आपल्याकडे आवश्यक बाळगले पाहिजे.आणि मला विश्वास आहे की संपूर्ण भारतभर हे पुस्तक लोकप्रिय होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप अहिरराव व्हाईस प्रेसिडेंट ग्रोव वेल इंटरनॅशनल फिड कंपनी यांनी आपले विचार व्यक्त करताना, डॉ. जोशी हे आपले गुरु असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ते म्हणाले की,या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक माशाबद्दल वेगळी माहिती दिलेली आहे.प्रत्येक माशाची वाढण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, तलावाचा प्रकार या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या इतर कुठेही कुठल्याही पुस्तकात सांगितलेल्या नाहीत, त्या डॉ.जोशी यांनी सांगितलेल्या आहेत.आणि त्यामुळेच विशिष्ट प्रकारच्या माशांची शेती करताना हे पुस्तक मत्स्य शेतकऱ्याला उपयोगी पडेल.
कार्यक्रमाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. याच वेळी मत्स्यअभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष मोहिते यांनी हे पुस्तक खरेदी करुन विद्यार्थ्यांना ते वाचण्यासाठी प्रेरीत करण्याचे आश्वासन दिले.सर्वांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण कार्यक्रम हिंदी भाषेमध्ये पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गोडसे यांनी केले.याप्रसंगी डॉक्टर जोशी यांचे अनेक मित्र मत्स्य क्षेत्रातील अनेक मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच डॉ.जोशी यांचे स्वकीय ऑफलाइन उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी अनिकेत कोनकर,परेश गुरव आणि सौ. सुनेत्रा जोशी यांनी विशेष सहकार्य केले.या पुस्तकाची किंमत ४२५ रू.आहे.अधिक पोस्टेज वेगळे आकारण्यात येईल.पुस्तकांसाठी 9423291434 या क्रमांकावर संपर्क साधावा.