सप्तश्रृंगी गड घाटात ‘एसटी’ बस दरीत कोसळली; एका महिलेचा मृत्यू, २२ जखमी*

 

नाशिक : सप्तश्रृंगीगड घाटात बसला अपघात झाला आहे.गणपती टप्प्यावरून बस घाटात कोसळल्याची घटना घडली. गडावरून मुक्कामी असलेल्या खामगाव डेपो एस.टी.बस घाट उतरतं असताना घाटात गेल्याने २२ प्रवासी जखमी झाले आहेत, तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या अपघातानंतर गडावरील ग्रामस्थांकडून मदत कार्य सुरू असून शासकीय यंत्रणा देखील गडावर पोहचली आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.

-दादा भुसे

पालकमंत्री नाशिक