गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे मुख्य महामार्गापासून ते गणेशवाडीकडे जाणारा साकव सोमवारी मध्यरात्री कोसळला.
सुमारे ६०वर्षापूर्वी कच्च्या दगड, मातीपासून बांधलेला हा साकव कोसळल्याने मुख्य रस्त्यापासून गणेशवाडीकडून गावाकडे जाणाऱ्याग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.
गुहागर गणेश वाडी जवळ साकव कोसळला
ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा मोठा मार्ग बंद
हा साकव जुना असल्याने तो गेली काही वर्षे धोकादायक बनला होता. साकवाचे संरक्षक कठडे तुटूनपडले होते.
पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन या साकवावरुन ये–जा सुरु होती. गुहागर विभागाकडे सार्वजनिक बांधकाम याबाबतवारंवार दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता.
मात्र, याकडे आजपर्यंत दुर्लक्षच झाले होते. हा साकव ग्रामस्थ,शाळेची मुलेव पालखी मार्गासाठी महत्वाचा होता.
हा साकव धोकादायक असल्याने दोनही बाजूने धोकादायक सूचनाफलक लावण्यात आलेहोते.
तरीही या साकवावरुन ये–जा सुरु होती. हा साकव मध्यरात्री कोसळल्याने जीवितहानी टळली आहे