सावंतवाडी । प्रतिनिधी : डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.यामध्ये कु.रुद्रांगी रविंद्र सावंत (इ.९ वी ),कु.अभिजित विजयकुमार गवस (इ.६वी) व कु.पियुष रघुनंदन माळकर (इ.९ वी) यांनी यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.