जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विधि सेवेने साधला विद्यार्थ्यांशी संवाद!
रत्नागिरी | प्रतिनिधी : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून पटवर्धन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लोक अभिरक्षक कार्यालय यांनी मंगळवारी कार्यक्रम आयोजित केला.
त्यावेळी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी, लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधी सहाय्यक ॲड. सौ. आयुधा अक्षय देसाई, ॲड. पल्लवी परशुराम धोत्रे, ॲड. यतीन अनिल धुरत तसेच संस्थेचे संचालक सुनील वणजू, कॉलेजच्या मुख्य प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव व दुसऱ्या – तिसऱ्या वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थी हे उपस्थित होते .
मुलांमध्ये आत्मविश्वास गरजेचा आहे तर प्रगती साधता येइल शिवाय सायबर सुरक्षितता देखील महत्वाची आहे असे मत विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी चे सचिव श्री. एन. जी. गोसावी यांनी मांडले.
लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधी सहाय्यक ॲड.आयुधा देसाई यांनी बालकांचे हक्क व अधिकार याबाबत विविध प्रबोधनपर गोष्टी सांगून मुलांशी संवाद साधला तर ॲड. पल्लवी धोत्रे यांनी बाल न्यायमंडळ कसे काम करते या बाबत माहिती दिली.ॲड. यतीन धुरत यांनी POCSO ACT ( लैंगिक गुन्हापासुन बालकांचे संरक्षण कायदा) या बाबत माहिती दिली. दीप्ती कदम यांनी सूत्रसंचालन केले.