आमदार नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले धांदेशाचे वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरवल येथील ओहोळात बुडालेल्या प्रचिती कुडतरकर यांचे पती प्रशांत कुडतरकर यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते ४ लाखांचा शासकीय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. प्रशांत कुडतरकर यांच्या शिरवल येथील घरी जात आमदार नितेश राणे यांनी धनादेश दिला. यावेळी तहसीलदार आर जे पवार, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तलाठी अर्जुन गुणावत, महादेव बाबर आदी उपस्थित होते. प्रचिती कुडतरकर यांचा कपडे धुण्यासाठी घरानजिकच्या ओहोळात गेल्या असताना पाण्यात वाहून बुडून मृत्यू झाला होता. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मृत प्रचिती चे वारस प्रशांत याना ४ लाख शासनाकडून मंजूर झाले होते. त्याचा धनादेश आज कुडतरकर याना देण्यात आला.