अरुअप्पा जोशी अकादमीच्या दोघांचे सेट परीक्षेत यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे सलग तीन वर्षे नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली होती. यावर्षी मार्च २०२३ च्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत अकादमीच्या दोन विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे. सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे राधेय पंडित हे समाजशास्त्र या विषयातून तर अकादमीचे विद्यार्थी महेश झोरे हे राज्यशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल केले आहे. महेश झोरे यांनी अकादमीमध्ये एमपीएससी राज्यसेवा हा कोर्स केला असून ते राज्यसेवा परीक्षांची तयारी करत आहेत. राधेय पंडित यांचा देखील यूपीएससीचा अभ्यास सुरू असून ते अकादमीमध्ये परीक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी येतात.