भाजप पुरस्कृत श्री स्वामी समर्थ गाव विकास पॅनलच्या विजयाचा विश्वास
मूलभूत विकासा सोबतच युवकांच्या रोजगारासाठी करणार प्रयत्न
सावंतवाडी । प्रतिनिधी : कास गांवात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचार करत असताना मतदारांचा मोठा पाठींबा मिळत आहे. जेष्ठांच्या आशिर्वादासोबतच विशेषतः युवकांची मोठी साथ लाभत आहे. गेल्या अनेक वर्षातील सामाजिक क्षेत्रातील अनुभव व काम करण्याची जिद्द यामुळे गावाचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. यात आमचे नेते केंदीय उद्योगमंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कास गावामध्ये राबविलेली अनेक विकास कामे यामुळे भविष्यातही भाजपच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी जनता आपल्याला निश्चितच साथ देईल त्यामुळे कास गावात आमचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार प्रवीण अशोक पंडीत यांनी व्यक्त केला. गावात सुरू असलेल्या प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
संपूर्ण कास गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. गावाच्या विकासाची धुरा सुशिक्षित आणि विचारी माणसांकडे देण्याची गरज आहे. यासाठी आमच्या पॅनलने गावाच्या समस्या सोडविण्यासाठी गावासाठी झोकून देणारे, आणि गावाच्या विकासाची जाण असणारे तरुण तडफदार कार्यक्षम उमेदवार म्हणून निवड केलेली आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आम्हाला खंबीर पाठिंबा आहे तसेच गावातील लोकांची ही दिवसेंदिवस वाढती साथ पाहता तुमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्हाला विकासाच्या माध्यमातून गावाची सेवा करायची आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असलेल्या या सर्व उमेदवारांना गामस्थांचा पाठिंबा निश्चीतच मिळेल. याची आम्हाला खात्री आहे. त्यामूळे या निवडणूकीमध्ये आम्ही भाजप पुरस्कृत श्री स्वामी समर्थ गाव विकास पॅनल उभे केलेले असून मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मतदान करून ग्रामस्थांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.