रत्नागिरी : रत्नागिरीच्या चि.इशान सतिश पेडणेकर याने अल अईन (यु.ए.इ.) येथे घेण्यात आलेल्या चौतिसाव्या इंटरनॅशनल बायोलाॅजी ऑलिंपियाड २०२३ मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून देशाची तसेच रत्नागिरीची मान उंचावली आहे.
यावर्षी प्रथमच भारतातील चारही विद्यार्थ्यांच्या चमूने सुवर्ण पदके मिळवून इतिहास रचला आहे. जागतिक स्तरावरून या मुलांचे कौतुक करण्यात येत आहे. या चमूतील मुलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत .१.मेघ छाबडा. जालना, महाराष्ट्र, २.इशान पेडणेकर, रत्नागिरी, महाराष्ट्र, ३.ध्रूव अडवानी, बेंगलोरू, कर्नाटक आणि ४.रोहीत पंडा,दूर्वा, छत्तीसगड. यांचा समवेश आहे.
या विद्यार्थ्यांना प्रो.मदन चतुर्वेदी (दिल्ली), डाॅ.अनुपमा रोनड (मुंबई), डाॅ.व्ही.व्ही.बिनाॅय (बेंगलोरू) आणि डाॅ.रामबहादूर सुबेदी (मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभले.