रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील खंडाळा येथे हॉटेल कर्मचार्याने अज्ञात कारणातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. दत्ताराम सोनू माईंगडे (28,मुळ रा.भोके सध्या रा.खंडाळा,रत्नागिरी) असे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे.दत्ताराम हॉटेलमधील नोकरी निमित्त खंडाळा येथे रहात आहे.मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात कारणातून त्याने विषारी औषध प्राशन केले.काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या नोतवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.