रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे दुचाक चालवून रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या प्रौढाला धडक देत अपघात केला.याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वा.मारुती मंदिर येथील खाउगल्ली समोर घडली होती.
याबाबत श्रीकृष्ण अनिल जोशी (47,रा.मौजे वरवडे नवेदरवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,4 जुलै रोजी सायंकाळी ते खाउगल्ली समोरील रस्त्याच्या बाजुला उभे असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्याने जोराने धडक देत अपघात केला.या धडकेत श्रीकृष्ण जोशी खाली पडून त्यांच्या उजव्या पायाला दुखापत होउन फ्रॅक्चर झाले आहे.याप्रकरणी त्यांनी मंगळवार 11 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Home महाराष्ट्र रत्नागिरी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या प्रौढाला धडक देणाऱ्या दुचाकी चालाकाविरोधात गुन्हा