कणकवली : आशिये-वरचीवाडी येथील मूळ रहिवासी दीपक प्रभाकर धुरी (४३, सध्या रा. पनवेल) यांचा बुधवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची खबर मयत यांचे चुलत काका सत्यवान लक्ष्मण धुरी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक धुरी हे १० जुलै रोजी पनवेल येथून आपल्या गावी आशिये येथे आले होते. दीपक धुरी यांना बुधवारी सकाळी अचानक घाम आल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.