कणकवली : जमिनीच्या वादातून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तोंडवली – कुडतडकरवाडी येथील विद्याधर जनार्दन कुडतडकर (५५) यांच्यावर भालचंद्र शांताराम कुडतडकर (७०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे घटना तोंडवली – कुडतडकरवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली.
मंगळवारी सायंकाळी विद्याधर कुडतरकर यांनी भालचंद्र कुडतरकर यांना तुमच्या जमिनीचे वाटप न झाल्याने तुम्ही येथील कंपाउंड व पायवाट बंद करू शकत नाही असे सांगितले. त्यावर शांताराम कुडतरकर यांनी येथे मला काजू लागवड करायची आहे. त्यामुळे येथे कंपाउंड केल्याशिवाय मी काजू लागवड करू शकत नाही असे सांगितले. याचा विद्याधर कुडतडकर यांना राग आल्याने त्यांनी भालचंद्र कुडतरकर यांना चीवीच्या काठीने दोन्ही पायावर मारून दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विद्याधर कुडतरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.