संगमेश्वर Breaking : करंजारीजवळ दोन ट्रकची भीषण धडक : १ ठार, ४ जखमी

रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर करंजारी (ता. संगमेश्वर) येथे आज दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात एक जणजण जगीच ठार झाला. अन्य चौघे जखमी झाले आहेत.

आज सायंकाळी साडेचारच्या दरम्यान करंजारी येथील वळणावर हा अपघात झालेला आहे

अपघातातील वाहन ट्रक क्रमांक एमएच ४२ बी ८९६१ ट्रक साखरपाच्या दिशेने चालला होता. त्यावर सुनील गंगाराम फोंडे, वय – 30 रा. साखरपा, ता. संगमेश्वर हा चालक होता. तर दुसरा ट्रक एमएच १२ केपी ७९६३ हा कोल्हापूरहून जयगडकडे चालला होता. त्यावर रामभाजू यादव, वय ३८, रा. हवेली पुणे, मूळ रा. उत्तरप्रदेश चालक होते.

अपघाताची हकीगत अशी एमएच १२ केपी ७९६३ हा ट्रक कोल्हापूर ते जयगड जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. तो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या एम एच ४२, बी ८९६१ या ट्रकवर जोरदार आदळला. समोरासमोर ठोकर दिल्याने गंभीर अपघात झाला. यात दोन्ही वाहनांच्या केबिनमध्ये दोन्ही चालक अडकून पडले. चालक रामभजू यादव मूळ रा. चांदोली, उत्तर प्रदेश गंभीर जखमी होते. त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. दुसऱ्या गाडीचे चालक सुनील गंगाराम फोंडे किरकोळ जखमी आहेत. अन्य जखमी असे- १) गणेश रामचंद्र बोडेकर, वय ३३ २) राजेश गंगाराम रावण, वय ३३ ३) योगेश कृष्णा यादव, वय २९ ४) सूरज सुरेश करवजे, वय २९. सर्व राहणार चाफवली ता. संगमेश्वर येथील आहेत.

अपघातग्रस्त वाहनातील केबिनमध्ये अडकलेल्या दोन्ही वाहन चालकांना जेसीबी, स्थानिक लोकांच्या मदतीने आणि साखरपा दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने बाहेर काढून तातडीने औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथे जिल्हा रुग्णालय येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या तसेच शासनाच्या रुग्णवाहिकेमधून पाठविण्यात आले आहे. अपघात झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली होती, जखमींना केबिन मधून बाहेर काढून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. अपघातातील पुढील कार्यवाही देवरुख पोलीस ठाणे करीत आहे. हातखंब्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.बी. पाटील सचिन भरणकर पुढील तपास करीत आहेत.