गोवेरी येथे तीन महिलांसह एका पुरूषावर कोयत्याने हल्ला

गडहिंग्लज येथील युवकाने केला हल्ला

कुडाळ | प्रतिनिधी 

गोवेरी येथील तीन महिलांसह एका पुरुषावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे गडहिंग्लज येथील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र या हल्ल्या मागील उद्देश अद्याप उघड झालेला नाही.

गोवेरी येथील वाळवे कुटुंबीयांच्या तीन महिलांवर गडहिंग्लज येथील युवकाने कोयत्याने हल्ला केला या महिलांची ओरड पडल्यावर त्या ठिकाणी जवळच असलेल्या ऋतिक परब या युवकाने धाव घेतली जेव्हा हल्लेखोराने कोयता उगारल्यावर ऋतिक परब यांनी मध्येच सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र ऋतिक परब याच्या हाताला गंभीर दुखापत होऊन चार बोटे गेले त्याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहेत तर हल्लेखोराला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला दाखल झाल्या होत्या.