पोसरे जि प आदर्श शाळा पुरस्कार लोकार्पण सोहळा

 

संतोष कुळे l चिपळूण : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा पोसरे नंबर 2 शाळेला रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत सन 2022- 23 साठी जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्राथमिक शाळेसाठी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल ग्रामस्थांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.

“शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान” आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी जिल्हा परिषदे कडून मिळालेल्या आदर्श शाळा पुरस्काराचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. अतिशय उत्साहात ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून पुरस्काराचा लोकार्पण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ , माता-भगिनी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच महेश आदवडे, ग्राम.सदस्या सौ.शिवण्या खाडे,कापरे केंद्राच्या केंद्रीय प्रमुख सौ शैलजा लांडे, बळीराम मोरे , जगदीश कांबळे सर, जिव्हाळा मार्ट चे मंगेश पेढांबकर अमोल भोबस्कर, सुभाष देसाई सर ,वर्षा देसाई, सुरेश आदवडे, संदीप उदेग, अविनाश आदवडे, शैलेश पोसनाक, नितेश खाडे, नंदा आदवडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश खाडे यांनी केले. तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्या. सुप्रिया सावर्डेकर यांनी केले.