नुकतीच दि.पाच जुलै रोजी मडगाव येथे कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक कोकणरेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक ,केरळ या चार राज्यातील प्रतिनिधीं सह कोकण रेल्वेचे सर्व संचालक उपस्थित होते.
या बैठकीस आपण अनेक वेळा उपस्थित राहीलो असुन प्रथमच चार राज्यातील पाच खासदार यावेळेस उपस्थित राहिले ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन या समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी केले.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्या. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती, भारतीय रेल्वेची बदललेली धोरणं,कोकण रेल्वे देशात करत असलेले प्रकल्प, चार राज्यांचा भाग भांडवलातील आतापर्यंतचा सहभाग ,प्रवासी वाहतूक व माल वाहतुकीने मिळणारे उत्पन्न, नजिकच्या काळात विद्युतीकरण ,तसेच मार्ग सुरक्षित करण्यासाठी झालेल्या उपाययोजना अशा बाबतीत सर्व सदस्यांना सीएमडी संजय गुप्ता यांनी अवगत केले.
सचिन वहाळकर यांनी यावेळी पुणे- सावंतवाडी ही गाडी कायमस्वरुपी प्रत्येक वीकएंडला सुरू ठेवण्याची मागणी केली असता या गाडीची शिफारस रेल्वेबोर्डा कडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.संगमेश्वर साठी राखीव डबा पॅसेंजरला या पुर्वी जसा होता तो पुर्ववत करण्याची मागणी केली असता तो दहा जुलै पासून करण्याचा निर्णय झाला. तुतारी एक्स्प्रेस ला करोना पुर्वी नांदगाव येथे हाॅल्ट होता सध्या तो बंद आहे तो पुन्हा चालूकरण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. यावेळी करोना पुर्वीचे सर्व हाॅल्टस कायम करण्यात यावेत असा ठराव सर्व सदस्यांनी करुन तो रेल्वेबोर्डाकडे पाठवायचा निर्णय झाला.बांद्रा टर्मिनस किंवा वसई येथुन रोज एक गाडी सोडण्याची मागणी मी केली परंतु यात काही तांत्रिक बाबी असून त्याचा पाठपुरावा पश्चिम रेल्वेकडे केल्याशिवाय अशी ट्रेन सुरू होऊ शकत नसल्याची माहीती देऊन हा प्रस्ताव पश्चिम रेल्वेकडे पाठवण्याचा निर्णय झाला.गणपतीसाठी पनवेल- चिपळूण या मार्गावर डिमयू सुरू करुन त्याच्या पंचवीस फेऱ्या प्रस्तावित करण्याचा निर्णय झाला. एकुण 308 गणपती स्पेशल ट्रेन प्रस्तावित असून त्या पैकी 208 च नोटिफिकेशन जुलैअखेर झाल आहे.सचिन वहाळकर यांनी या वेळी गणपती बुकिंग दरम्यान एक मिनीटात सर्व बुकिंग फुल झाल्याचा विशेष मुद्दा उपस्थित करत याबाबत मध्यरेल्वेने चौकशी करुन त्याची विस्तृत माहीति मिडीया मधुन दिली पण कोकण रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती स्थानिक मिडीयामधुन प्रवासी वर्गाला न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भविष्यात को.रे.च्या जनसंपर्क विभागाने याची व इतर वृत्तांची दखल तातडीने घेण्याची सुचना केली.महाराष्ट्र सरकारकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील स्टेशन ना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काॅन्क्रीटिकरणा साठी 65 कोटींची तरतूद केल्याबद्दल राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांचे अभिनंदन करण्याचा ठराव सचिन वहाळकर यांनी मांडला त्याच स्वागत सर्व खासदारांनी करत हा ठराव मंजूर करण्यात आला. अनेक विषय हे मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे,तसेच रेल्वेबोर्डाच्या कार्यकक्षेत असल्याने ते सोडवण्यासाठी उपस्थित खासदारांनी प्रयत्न करावेत अशी विनंती वहाळकर यांनी सर्व खासदारांना केली.
वरीष्ठ नागरीकांना दिल्या जाणाऱ्या श्रावण सेवेचा मुद्दा उपस्थित करत रत्नागिरी स्थानकावर ही सेवा मिळण्यात काही दिवसांपूर्वी अडचणी येत होत्या परंतु आता ही सेवा पुर्ववत केल्याबद्दल रेल्वेप्रशासनाचे आभार मानले.या व्यतिरिक्त खासदार धनंजय महाडिक यांनी वैभववाडी कोल्हापूर या प्रकल्पाबाबत मुद्दा उपस्थित केला असता हा प्रस्ताव आता कोकण रेल्वेच्या अखत्यारीत नसुन रेल्वेमंत्रालयाकडे आहे अशी माहीती मिळताच आपण स्वतः याचा पाठपुरावा करु अस खासदार महाडिक यांनी सांगितले.या बैठकीची माहिती देत असता आपण भविष्यात कोकण रेल्वेवरील छोट्या स्थानकांना भेट देऊन तेथील समस्यां सोडवण्या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे सचिन वहाळकर यांनी सांगितले.
Home महाराष्ट्र रत्नागिरी कोकणरेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत रेल्वेच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा- सचिन वहाळकर